जेव्हाही सलमान खानच्या गर्लफ्रेंडचा विषय निघतो, तेव्हा सोमी अलीचे नाव नक्कीच घेतले जाते.
सोमी अली ही मुळची पाकिस्तानी असून, तिची आई इराकची तर वडील पाकिस्तानचे आहेत.पण, नंतर ती तिच्या आईसोबत अमेरिकेत फ्लोरिडा येथे शिफ्ट झाली.
सोमी अलीला लहानपणापासूनच बॉलिवूडचे आणि विशेषतः सलमान खानचे खूप आकर्षण होते, त्यामुळे वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी तिने मुंबईगाठली होती.
सोमी अलीचा सलमान खानसोबतचा ‘बुलंद’ हा पहिला चित्रपट होता, पण काही कारणास्तव तो प्रदर्शित झाला नाही. हळूहळू सोमी आणि सलमानची जवळीक वाढत गेली आणि लवकरच त्यांच्या प्रेमाच्या चर्चा रंगू लागल्या.
सलमानने हे नाते मान्य केले नसले, तरी मीडिया रिपोर्ट्सनुसार दोघांनी एकमेकांना तब्बल 6 वर्षे डेट केले होते.त्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या.
बॉलिवूडच्या 6 वर्षाच्या कारकिर्दीत सोमी अलीचे एकूण 8 चित्रपट प्रदर्शित झाले. यामध्ये ‘अंत’, ‘कृष्ण अवतार’, ‘यार गद्दार’, ‘तीसरा कौन’, ‘आओ प्यार करें’, ‘आंदोलन’, ‘माफिया’ आणि ‘चुप’ या चित्रपटांचा समावेश होता.
पण यापैकी एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कमाई करू शकला नाही.
सोमी अली सध्या मियामीमध्ये राहते. सोमी अलीने अभिनय सोडला असून, ती ‘नो मोअर टियर्स’ नावाचा एनजीओ चालवते.