‘गल्ली बॉय’ फेम अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आज (29 एप्रिल) आपला 29वा वाढदिवस साजरा करत आहे.



‘गल्ली बॉय’, ‘गेहरांईया’ आणि ‘बंटी और बबली’ या चित्रपटातील सिद्धांत चतुर्वेदीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.



कोणत्याही व्यक्तिरेखेत इतक्या सहजतेने फिट होणाऱ्या सिद्धांत चतुर्वेदीला अभिनेता होण्याआधी काहीतरी वेगळे व्हायचे होते.



अभिनय हेच त्याचं पहिलं प्रेम आहे. पण, सिद्धांत अभ्यासातही प्रचंड हुशार होता.



अभिनेता होण्यापूर्वी त्याने सीएच्या परीक्षेची तयारी केली होती आणि त्याने सीएची परीक्षा देखील क्लीअर केली होती.



मात्र, अभिनयाकडेचं त्याचं मन धाव घेत होतं. यानंतर त्याने मनोरंजन विश्वाकडे वळण्याचा निर्णय घेतला.



पहिल्याच चित्रपटाने अर्थात ‘गल्ली बॉय’ने त्याच्या फिल्मी करिअरला कलाटणी दिली.



'गल्ली बॉय'मध्ये रणवीर सिंहसारख्या अभिनेता मुख्य भूमिकेत असूनही, सिद्धांत चतुर्वेदी चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर चर्चेत राहिला होता. यानंतर त्याच्याकडे नवीन चित्रपटांची रांगच लागली.



2016 मध्ये सिद्धांतनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानं 'लाइफ सही है' आणि 'इनसाइड एज' या सीरिजमध्ये काम केलं.



लवकरच सिद्धांतचा 'फोन भूत' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये सिद्धांतसोबतच कतरिना कैफ आणि ईशान खट्टर हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.