आहारात ड्रायफ्रुट्सचा समावेश करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. तसं पाहायला गेलं तर सर्व ड्रायफ्रुट्स आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
आहारात ड्रायफ्रुट्सचा समावेश करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. तसं पाहायला गेलं तर सर्व ड्रायफ्रुट्स आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
जाणून घेऊया व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचा उत्तम स्त्रोत असणाऱ्या बदाम खाण्याचे काही आरोग्यदायी फायदे..
एका संशोधनातून सिद्ध झाल्यानुसार, दररोज जवळपास 20 ग्रॅम बदाम खाल्याने हृदयरोग आणि कॅन्सरपासून सुटका होण्यास मदत होते.
तसेच संशोधनामध्ये सांगितल्यानुसार, मुठभर बदाम दररोज खाल्याने लोकांमध्ये हृदय रोगाचा धोका 30 टक्क्यांनी कमी होतो. यामुळे 15 टक्के कॅन्सरचा धोका धोका कमी होतो.
दररोज सकाळी उठल्यानंतर भिजवलेले बदाम खाल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो.
सकाळी दुधासोबत बदामाचे सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
बदामांचं सेवन केल्याने त्वचेच्या सौंदर्यासोबतच केसांचं सौंदर्य वाढण्यासही मदत होते.हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठीही बदाम खाण्याचा सल्ला देण्यात येतो.
गर्भवती महिलांसाठीही बदामाचं सेवन करणं फायद्याचं ठरतं.बदामामध्ये असलेलं फायबर पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी मदत करतं.
हाडांचं आरोग्य राखण्यासाठीही बदाम मदत करतं.कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी बदाम अत्यंत उपयोगी ठरतं.सदर उपायाचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापर करणे फायदेशीर ठरते, ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.