दिवाळीचा सण म्हणजे सर्व बाळगोपाळांना आणि मोठ्यांनाही आनंदाचा सोहळा.
अशा या आनंदाच्या सोहळ्यात “दिवाळी किल्ला” बनवणे ही तर मोठी पर्वणीच.
आणि जर का हा किल्ला शिवरायांचा ऐतिहासिक किल्ला असेल तर हा योग काय वर्णावा.
मातीपासून हा किल्ला तयार करताना मुलांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला असतो.
या किल्ल्यावर उभे करण्यासाठी मातीचे सैनिक घेतले जातात.
मुलं “ऐतिहासिक किल्ले” बनवताना आपोआप त्याची थोडी माहिती घेतील, किल्ले भ्रमण करतील.
शिवचरित्र वाचण्याची जिज्ञासा निर्माण होईल, किल्यांच्या रूपाने ऐतिहासिक स्थाने जतन करण्याची प्रेरणा मिळेल.
मराठमोळी मंडळी तर आवर्जून दिवाळीत किल्ले करण्यात मागे हटत नाही
अश्यातच अमराठी राज्यात देखील किल्ले बांधणी स्पर्धा घेतल्या जातात.
अश्याच काही चिमुकल्यानी साकार केलेले किल्ले सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.