दिवाळी अवघ्या दोन दिवसांवर आली आहे.

त्यामुळे बाजारात विविध वस्तूंची रेलचेल पाहायला मिळतेय.

बाजारात विविध सजावटीच्या वस्तू, दिवे, रांगोळी यांच्यासह रंगीबेरंगी आकाशकंदीलांनी देखील बाजारपेठा सजल्या आहेत.

दिव्यांचा आणि प्रकाशाचा उत्सव असणारा दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.

दिवाळीनिमित्त बाजारपेठ सजण्यास सुरुवात झाली असून आकाशकंदील विक्रेत्यांनी दुकानं थाटली आहेत.

पर्यावरणपूरक आकाशकंदील यांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

विविध प्रकारचे आकाशकंदील, पणत्या बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या असून खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय.

दिवाळीनिमित्त बाजारात अनेक वस्तू पाहायला मिळतात.

ग्राहकांनी भारतीय वस्तूंना प्राधान्य देण्यास पसंती केली आहे.

त्यामुळे बाजारात मिळणाऱ्या आकाशकंदील, पणत्यांसह विविध सजावटीच्या वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणात होतेय.