आनंदाचा, उत्साहाचा आणि प्रकाशाचा असा दिवाळी (Diwali 2023) सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. अशातच सर्वांची दिवाळी खरेदीसाठी लगबग बाजारात पाहायला मिळतेय. जगभरात दीपावलीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. येत्या दिवाळी पाडव्याला तुम्हीही सुंदर लूक करू शकता. पुरुषांसाठी दिवाळीचे स्वस्तात मस्त कुर्ते बाजारात उपलब्ध झाले आहेत. कुर्ते विविध रंग तसेच विविध नक्षीदार रचनांमध्ये पाहायला मिळतात. कुर्ते कमी दरात मिळत असून त्यांच्या कपड्याची गुणवत्ता देखील उत्तम आहे. ५०० रुपयांपासून कुर्ते सुरु होत आहे. कॉटन कुर्ता पायजमा,पठाणी कुर्ता पायजमा,बांधणी कुर्ता असे वेगवेगळे प्रकारचे कुर्ते बाजारात उपलब्ध आहेत. साजेशी कोल्हापूरी चप्पल घालून आपला लूक तयार होतो.