धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर तुमच्या राशीनुसार हे उपाय करा, ज्यामुळे तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल आणि अपूर्ण काम पूर्ण होतील.



सर्व 12 राशीच्या लोकांसाठी काय खरेदी करणे शुभ राहील, जाणून घ्या.



मेष राशीसाठी धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तेलाचा दिवा लावा आणि त्यात दोन काळे गुंजा ठेवा. यामुळे वर्षभर आर्थिक स्थैर्य राहील. या दिवशी सोने खरेदी करणं लाभदायक ठरेल.



वृषभ राशीच्या लोकांनी धनत्रयोदशीच्या दिवशी कपडे, सोने, चांदी या वस्तू खरेदी करणे तुमच्यासाठी शुभ राहील. पण तेल, लाकडी वस्तू, चामड्याच्या वस्तू खरेदी करू नका.



मिथुन राशीच्या लोकांनी धनत्रयोदशीच्या दिवशी रत्न, जमीन, घर या गोष्टींची खरेदी करणे तुमच्यासाठी शुभ राहील. पण लाकडी वस्तू आणि अॅल्युमिनियमच्या वस्तू खरेदी करू नका.



कर्क राशीच्या लोकांनी या दिवशी साखर, पांढरे वस्त्र आणि वाहन खरेदी करणे तुमच्यासाठी शुभ राहील. पण काळ्या वस्तू खरेदी करू टाळा.



धनत्रयोदशीच्या दिवशी सिंह राशीच्या लोकांसाठी सोने, इलेक्ट्रॉनिक वस्तू यासारख्या वस्तूंची खरेदी करणे तुमच्यासाठी शुभ राहील. पण लोखंडापासून बनवलेल्या वस्तू खरेदी करू नका.



कन्या राशीच्या लोकांनी दोन कमळाची फुले घेऊन देवी लक्ष्मीच्या मंदिरात अर्पण करा. फर्निचर, हिरवे कपडे, सोने या वस्तू खरेदी करणे तुमच्यासाठी शुभ राहील, पण पांढऱ्या रंगाचे कपडे खरेदी करू नका.



तूळ राशीच्या लोकांनी लक्ष्मी मातेला नारळ अर्पण करा. या दिवशी हिऱ्यांचे दागिने, परफ्यूम आणि सौंदर्य प्रसाधने या वस्तू खरेदी करणे तुमच्यासाठी शुभ राहील. लोखंडापासून बनवलेल्या वस्तू खरेदी करणं टाळा.



धनत्रयोदशीला वृश्चिक राशीच्या लोकांनी लाल कपडे, जमीन, घर या गोष्टी खरेदी करणे तुमच्यासाठी शुभ राहील. पण काळ्या रंगाचे कपडे खरेदी करू नका.



धनु राशीच्या लोकांसाठी या दिवशी धातू, जमीन, घर या वस्तू खरेदी करणे तुमच्यासाठी शुभ राहील, पण फर्निचर आणि सौंदर्य वस्तू खरेदी करू नका.



मकर राशीच्या लोकांसाठी सोने खरेदी शुभ राहील, पिवळे कपडे किंवा पिवळ्या रंगाची मिठाई खरेदी करू नका.



धनत्रयोदशीच्या दिवशी कुंभ राशीच्या लोकांनी स्टेशनरी वस्तू आणि वाहन खरेदी करणे शुभ राहील, लोखंडापासून बनवलेल्या वस्तू खरेदी करू नका.



मीन राशीच्या लोकांसाठी चांदी, रत्न, पुष्कराज, सोने या वस्तू खरेदी करणे शुभ राहील. अॅल्युमिनियमपासून बनवलेल्या वस्तू खरेदी करू नका.