कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्ष त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते.



या वर्षी 10 नोव्हेंबरला धनत्रयोदशी आहे.



धार्मिक परंपरेनुसार, धनत्रयोदशीला 13 दिवे लावले जातात.



घराबाहेर दक्षिणेला तोंड करुन पहिला दिवा लावावा.



दुसरा तुपाचा दिवा देवघरात लावावा, यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते



तिसरा दिवा मुख्य दारात लावावा.



तुळशीत चौथा दिवा लावावा आणि पाचवा दिवा घराच्या छतावर लावला पाहिजे.



सहावा तेलाचा दिवा हा पिंपळाचं झाड असल्यास त्याखाली लावावा.



सातवा दिवा कोणत्याही जवळच्या मंदिरात लावावा.



आठवा दिवा कचऱ्याजवळ आणि नववा दिवा किचनमध्ये लावावा.



दहावा दिवा हा खिडकीत, तर अकरावा दिवा हा घरातील शेवटच्या कोपऱ्यात लावावा.



शेवटचे दोन दिवे घराच्या अंगणात दोन्ही बाजूला लावावे.