छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी वेगवेगळ्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येते. आपल्या अभिनयानं तिनं छोट्या पडद्यावर विशेष ओळख निर्माण केली 'बनूं मैं तेरी दुल्हन' या मालिकेमधून तिनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. दिव्यांका मालिकेच्या एका एपिसोडसाठी 1.50 लाख मानधन घेते. मुंबईमध्ये दिव्यांकाचे घर आहे. दिव्यांकाच्या या घराची किंमत जवळपास चार कोटी आहे दिव्यांकाकडे बीएमडब्ल्यू यांसारख्या लग्झरी गाड्या आहेत. दिव्यांकाकडे एकूण 20 कोटींची संपत्ती आहे. वर्षभरात दिव्यांका जवळपास दिड कोटी रूपये कमावते.