सणासुदीच्या काळात प्रत्येक घरांत फराळ तर बनवले जातातच पण त्याचबरोबर मिठाई देखील बनवली जाते.

मधुमेही रुग्णांनी मिठाई खावी की नाही हा मोठा प्रश्न पडतो.

व्यायाम करा
दररोज व्यायाम किंवा योगासने केल्याने शरीराला अनेकक फायदे मिळतात.

यामुळे तुमच्या साखरेची पातळी नियंत्रणात तर राहतेच पण आरोग्यही सुधारण्यास मदत होते.

पोर्शन कंट्रोल करा
जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल,तर नेहमी तुमच्या खाण्याच्या पोर्शनवर कंट्रोल करा.

म्हणजेच जेव्हा एखादा चवदार पदार्थ तुमच्यासमोर येईल तेव्हा तो मर्यादित प्रमाणात खा.

यामुळे तुमची साखरेची पातळी अचानक वाढणार नाही.

कमी कॅलरीजचे अन्नपदार्थ खा
सणासुदीच्या काळात बहुतेक घरांत पुरी, पनीर, मसाल्याचे पदार्थ इत्यादी तेलकट पदार्थ बनवले जातात.

यापासून तुम्ही दूर राहणं गरजेचं आहे. कारण यामुळे तुमचे शरीर निरोगी राहण्यास मदत होईल.

टीप : या सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने.