देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या संसर्गात घट झाली आहे, पण वाढलेली सक्रिय रुग्णांची संख्या चिंतेचं कारण बनली आहे



देशात गेल्या 24 तासांत नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे



शनिवारच्या तुलनेत रविवारी कमी कोरोनारुग्ण सापडले आहेत, त्यामुळे ही एक दिलासादायक बाब आहे



16 हजार 678 नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून 26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे



देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या एक लाख 30 हजारांच्या पार गेली आहे



कोरोनामुळे एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्यानेही पाच लाख 25 हजारांचा आकडा पार केला आहे



देशातील कोरोनाच्या नव्या रुग्णांची कमी भर पडली आहे, पण सक्रिय रुग्णांचा आलेख मात्र चढतानाच दिसत आहे



देशात सध्या 1 लाख 30 हजार 713 सक्रिय रुग्ण आहेत