बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादूकोण (Deepika Padukone) चाहता वर्ग मोठा आहे. तिच्या चित्रपटांची तिचे चाहते उत्सुकतेने वाट पाहात असतात. दीपिका लवकरच तिच्या आगामी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. चित्रपटांच्या सेटवर धमाल मस्ती करतानाचे व्हिडीओ आणि फोटो दीपिका सोशल मीडियावर शेअर करते. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये दीपिकाने सांगितलं की चित्रपटाच्या सेटवर जाताना सोबत रंगित पेन्सिल बॉक्स घेऊन जाते. त्याचं कारणंही तिने सांगितले आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये दीपिकाने सांगितले की, ती चित्रपटाच्या शूटिंगला जाताना सोबत रंगीत पेन्सिलचा बॉक्स घेऊन जाते. या पेन्सिल्सचा वापर ची स्क्रिप्ट वाचताना डायलॉग्स हायलाइट करण्यासाठी करते. तिची ही सवय दिग्दर्शक शकुन बत्रा यांनी पाहिली होती. दीपिका पादूकोणचा लवकरच पठाण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.