भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर लग्नाच्या बंधनात अडकला आहे. आग्र्यामध्ये दीपक चाहरने पाहुण्यांच्या उपस्थितीत जया भारद्वाजसोबत लग्न केले आहे. दीपक चाहरच्या लग्नाचे फोटो आणि व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मंगळवारी दीपक चाहर आणि जया भारद्वाज यांचा हळदी समारंभ पार पडला होता. दीपक चाहरच्या लग्नाला अनेकांनी उपस्थिती दर्शवली. दीपक चाहरने स्टेडिअममध्येच प्रेयसी जया भारद्वाज हिला लग्नासाठी प्रपोज केले होते. दीपक चाहरनं गुडघ्यावर बसून आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं. यावेळी, आजूबाजूला उभ्या असणाऱ्या लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दोघांनाही शुभेच्छा दिल्या. दीपक चाहरची पत्नी जया भारद्वाज दिल्लीमधील बारहखंबा येथे राहणारी आहे. जया भारद्वाजने MBA केलेले आहे. जया एका टेलीकॉम कंपनीमध्ये डिजिटल प्लेटफार्म प्रमुख आहे. दीपक चाहरच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.