अक्षर पटेलनं इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळलाय. भारताचा युवा फलंदाज इशान किशननं इंग्लंडविरुद्ध टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय. भारताचा अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पंड्यानं इंग्लंडविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळलाय. सूर्यकुमार यादवनं यावर्षी इंग्लंडविरुद्ध टी-20 क्रिकेट आणि श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पृथ्वी शॉ या वर्षी श्रीलंकेविरुद्ध पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलाय. श्रेयस अय्यरनं न्यूझीलंडविरुद्ध भारतीय कसोटी संघात पदार्पण केलं. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरनेही याच वर्षी कसोटी पदार्पण केलं.