लाफ्टर क्विन भारतीनं चाहत्यांना दिली 'गुड न्यूज'!



लाफ्टर क्विन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया आई-बाबा होणार आहेत.



भारतीने शुक्रवारी इंस्टाग्रामवर भन्नाट व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.



भारती आणि हर्षने त्यांच्या नवीन यूट्यूब चॅनेल 'लॉल लाईफ ऑफ लिंबाचियाज' वर पोस्ट केलेल्या 'हम माँ बनने वाले है'



भारती सिंगने हर्ष लिंबाचियासोबत 3 डिसेंबर 2017 मध्ये गोव्यात पंजाबी पद्धतीनं धूमधडाक्यात लग्न केलं.



यामध्ये हळदी समारंभ, मेहेंदी समारंभ, पूल पार्टी आणि संगीत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.



मोनालिसा आणि पती विक्रांत सिंग राजपूत यांसारखे अनेक सेलिब्रिटी, कॉमेडियन सुनील ग्रोव्हर, अभिनेत्री अनिता हसनंदानी, अभिनेत्री किश्वर मर्चंट आणि तिचा पती सुयश राय आणि करण वाही या लग्नसोहळ्यात सहभागी झाले होते.



भारती आणि हर्ष लिंबाचिया यांनी अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये एकत्र काम केले आहे.