मुंबईतील शिवाजी पार्कात दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे.



या दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक शिवाजी पार्कात दाखल झाले आहेत.



दरम्यान शिवसेना भवन परिसरामध्ये शिवसैनिकांचा उत्साह पाहायला मिळतोय.



उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कात तुफान गर्दी जमा झालेली पाहायला मिळतेय.



यामध्ये विशेष बाब म्हणजे हिंदू बांधवांबरोबरच मुस्लिम बांधवांचा देखील सहभाग पाहायला मिळतोय.



उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक हे शिवाजी पार्कात दाखल होत आहेत.



दरम्यान, आज उद्धव ठाकरे काय बोलतील याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे.



दादर येथील शिवाजी पार्कात ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय.



या दसरा मेळाव्याला अनेक दिग्गज व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत.



या दरम्यान राजकीय नेत्यांचे अनेक आरोप प्रत्यारोप देखील पाहायला मिळणार आहेत.