डान्स इंडिया डान्स या रिअॅलिटी शोच्या (Dance India Dance) सीझन 2 विजेती डान्सर आणि कोरिओग्राफर शक्ती मोहन (Shakti Mohan). शक्ती मोहननं स्टार प्लसवरील डान्स रिअॅलिटी शो ‘डान्स प्लस’ (Dance Pluse) मध्ये जज म्हणूनही काम केलं आहे दिल्लीमध्ये जन्मलेल्या शक्ती मोहनने यशाचे हे शिखर मेहनतीच्या बळावर गाठले आहे.ं दिल्लीमध्ये जन्मलेल्या शक्ती मोहनने यशाचे हे शिखर मेहनतीच्या बळावर गाठले आहे. शक्तीला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. ती अभ्यासात देखील हुशार असल्याने तिला आयएएस अधिकारी व्हायचे होते शक्तीने जेव्हा नृत्य क्षेत्रातच करिअर करायचा निर्णय घेतला तेव्हा ती 2006 साली मुंबईत शिफ्ट झाली. नंतर ती 2009 मध्ये ‘डान्स इंडिया डान्स’ या रिअॅलिटी शोच्या सीझन 2 मध्ये भाग घेत स्पर्धेची विजेता ठरली माहितीनुसार जेव्हा शक्ती 4 वर्षांची होती तेव्हा तिचा अपघात झाला होता. शक्तीच्या या यशात तिच्या आई-वडिलांची महत्त्वाची भूमिका आहे.