तब्बल दोन वर्षानंतर साजरा केल्या जाणाऱ्या या उत्सवात लहान बालकांचाही उत्साह पाहण्यासारखा आहे.



आजकाल सोशल मीडियावर लहान बाळांचे फोटो व्हायरल होताना दिसतायत.



यामध्ये कोणी कृष्ण तर कोणी राधा बनून फोटोशूट करताना दिसत आहेत.



लहान बालगोपाळांचे हे फोटो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.



लहान मुलांचे पालक हौस म्हणून आपल्या मुलांना वेगवेगळे पोषाख परिधान करून क्यूट फोटोशूट करतात.



सोशल मीडियाच्या या युगात बच्चे कंपनीही कुठे मागे राहिली नाही.



या लहानग्यांचे हे फोटो पाहून तुम्हालाही तुमचं बालपण नक्कीच आठवलं असणार.



सोशल मीडियावर हे अनोखे व्हायरल फोटो अपलोड करून दहीहंडीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.