हार्दिक पांड्या आशिया कपच्या फायनलपूर्वी जखमी झाल्यानं तो संघाबाहेर गेला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीतील विजयी संघाचा सदस्य असलेल्या मोहम्मद शमीला संधी मिळाली नाही. त्याचं करिअर संकटात आलंय.
वरुण चक्रवर्तीला वनडे संघात स्थान मिळालेलं नाही. मात्र, त्याला टी 20 संधी मिळालीय.
जसप्रीत बुमराहला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी आराम देण्यात आला आहे. त्याला टी 20 संघात स्थान देण्यात आलंय.
संजू सॅमसनला वनडे संघात स्थान मिळालेलं नाही. केएल राहुल वनडेतील विकेट कीपर असेल. तर ध्रुव जुरेल ला बॅक अप विकेटकीपर म्हणून संधी मिळालीय.
रोहित शर्मा आता फक्त खेळाडू म्हणून संघात असेल. चॅम्पियन्स ट्रॉफी त्याच्या नेतृत्त्वात भारतानं जिंकली होती.
शुभमन गिल भारताचा वनडेतील नवा कॅप्टन आहे. कसोटीनंतर आता वनडेमध्ये तो नेतृत्व करेल.
विराट कोहली देखील चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर मैदानावर उतरेल.
श्रेयस अय्यरचं प्रमोशन करण्यात आलं असून तो उपकॅप्टन आहे.