कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम अंतर्गत 2 कोटी डोसेस देण्याचा महत्त्वाचा टप्पा मुंबई महानगराने गाठला आहे.



या कामगिरीमध्ये मुंबईतील सर्व शासकीय,महानगरपालिका व खासगी लसीकरण केंद्रांवरील लसीकरणाचा समावेश आहे.



कोविड लसीचा पहिला आणि दुसरा डोस तसेच बूस्टर डोस यांचा देखील समावेश आहे.



बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या कामगिरीबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे.



मुंबईसह देशभरात 16 जानेवारीला कोविड-19 प्रतिबंधक राष्ट्रीय लसीकरण मोहीम सुरु झाली.



टप्प्याटप्प्याने या मोहिमेची व्याप्ती वाढविण्यात आली.



सर्वाधिक वेगाने लसीकरण करण्यात मुंबई आघाडीवर



मुंबई महानगरपालिकेसाठी विविध समाज घटकांसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करुन विशेष लसीकरण सुरु करण्यात आले. लसीकरण केंद्रांवर जास्त वेळ रांगेत उभे राहावे लागू नये.