देशात कोरोनाचा कहर पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ दिसत आहे त्यामुळे कोरोनाची संभाव्य चौथी लाट लवकरच धडकणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे देशात गुरुवारी दिवसभरात 7584 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तसेच गेल्या 24 तासांत 24 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे महाराष्ट्र, दिल्ली यासारख्या राज्यांमध्ये कोरोना चांगलाच फोफावताना दिसत आहे महाराष्ट्रात दिवसागणिक मोठी रुग्णवाढ पाहता राज्य सरकारने पुन्हा एकदा बंदिस्त जागी मास्क सक्ती लागू करत नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 36 हजारांच्या पुढे गेली आहे सध्या 36 हजार 267 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत गुरुवारी दिवसभरात 3791 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 4 कोटी 26 लाख 44 हजार 92 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत