अभिनेत्री तेजस्वी प्रकाश वायंगणकर देशातील सर्वात लोकप्रिय टीव्ही शो ‘बिग बॉस 15’चे विजेतेपद पटकावून प्रचंड चर्चेत आली.



या शोमधून तिला प्रचंड फॅन फॉलोईंग मिळाली आहे.



10 जून 1993 रोजी जेद्दाह, सौदी अरेबिया येथे जन्मलेल्या तेजस्वी प्रकाशचा ‘बिग बॉस 15’ची विजेती होण्यापर्यंतचा प्रवास खूपच रोमांचक होता.



इंजिनियर बनण्याचं स्वप्न बघणाऱ्या तेजस्वी प्रकाशने भारतीय टेलिव्हिजनच्या जगात आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे.



टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही मुंबईतील वायंगणकर या मराठमोळ्या कुटुंबातील आहे. तिचे कुटुंब संगीत क्षेत्राशी निगडीत आहे.



तेजस्वी प्रकाशचा जन्म सौदी अरेबियात झाला असला, तरी ती लहानाची मोठा मराठी भाषिक कुटुंबात झाली. त्यामुळेच तिलाही शास्त्रीय संगीताची आवड आहे.



तेजस्वीने सुमारे चार वर्षे भारतीय शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षणही घेतले. तेजस्वीला इंजिनियर व्हायचे होते.



प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने मुंबई विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले.



अभिनयात नशीब आजमावण्यासाठी आणि टीव्ही इंडस्ट्रीत करिअर करण्यासाठी इंजिनियरिंग सोडून अभिनयाच्या दुनियेत पाऊल टाकले.



Thanks for Reading. UP NEXT

अभिनेत्री नयनतारा अडकली विवाह बंधनात!

View next story