देशातील कोरोना संसर्गाचा आलेख दिवसागणिक वाढत आहे गेल्या 24 तासांत देशात 3545 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 27 जणांचा मृत्यू झाला आहे देशातील सक्रीय रुग्णांची संख्या 19 हजार 688 वर पोहोचली आहे काल दिवसभरात देशात 3275 नव्या कोरोना रुग्णांची नोंद आणि 55 लोकांचा मृत्यू झाला देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 19 हजार 688 इतकी झाली आहे गुरुवारी दिवसभरात देशात 3549 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 51 हजार 248 जण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत भारतात कोरोनामुळे 5 लाख 24 हजार 2 रुग्णांनी प्राण गमावला आहे गुरुवारी दिवसभरात 16 लाख 59 हजार 843 कोरोना लसी देण्यात आल्या आहेत देशात आतापर्यंत 189 कोटी 81 लाख 52 हजार 843 कोरोना लसी देण्यात आल्या आहेत