देशात कोरोना विषाणूच्या वाढता आलेख मागील काही दिवसापासून घटताना दिसत आहे देशातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत मोठी घट झाली आहे गेल्या 24 तासांत देशात 2 हजार 827 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून असून 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे आधीच्या दिवसाच्या तुलनेनं नवीन कोरोना रुग्णांची संख्या 70 ने घटली आहे गेल्या 24 तासांमध्ये 24 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून आधीच्या दिवशी कोरोनाबळींची संख्या 54 होती. नव्या कोरोना रुग्णांमधील 970 रुग्ण फक्त दिल्लीतच आढळले आहेत यामागोमाग केरळमध्ये 489 रुग्ण आणि हरियाणामध्ये 383 रुग्णांची नोंद झाली आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार सलग तिसऱ्या दिवशी नवीन कोरोना रुग्णांची संख्या तीन हजारांच्या खाली आहे देशात गेल्या 24 तासांत 3 हजार 230 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत