देशात एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढतोय तर दुसरीकडे मंकीपॉक्स व्हायरसचाही धोका आहे देशात सलग दुसऱ्या दिवशी 20 हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे गेल्या 24 तासांत देशात 20 हजार 38 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे आणि 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे आदल्या दिवशी 20 हजार 139 रुग्ण आणि 38 रुग्णांचा मृत्यू झाला देशात गुरुवारी दिवसभरात 47 जणांचा मृत्यू झाला देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 5 लाख 25 हजार 604 इतकी झाली आहे सध्या भारतात कोरोनाचे 1 लाख 39 हजार 73 सक्रिय रुग्ण आहेत सक्रिय रुग्णसंख्येचे प्रमाण 0.32 टक्के तर, देशातील कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण 98.48 टक्क्यांवर पोहोचलं आहे गेल्या 24 तासांत 16 हजार 994 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत आतापर्यंत 4 कोटी 30 लाख 45 हजार 350 रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे