दक्षिण ते बॉलीवूड चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या तापसी पन्नूच्या चाहत्यांची यादी बरीच मोठी आहे. तिच्या चित्रापटामधील अभिनयाला प्रेक्षकाांची पसंती मिळते. रिपोर्टनुसार, डेनमार्कचा बॅडमिंटनपटू 'मॅथियास बो'ला तापसी डेट करत आहे. अभिनेत्रीने काही काळापूर्वी हटके लूक शेअर केला आहे. तापसी पन्नूने या फोटोशूटदरम्यान न्यूड ब्लेझर घातला आहे, कर्ली हेअरस्टाईलमुळे तिचा लुक आणखी खुलला आहे. तापसी पन्नू सध्या तिच्या आगामी 'शाबाश मिठू' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तापसीच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे तर ती शाहरुख खानच्या 'डंकी' चित्रपटाव्यतिरिक्त 'वो लड़की है कहां' आणि 'ब्लर'मध्ये दिसणार आहे (Photo:@taapsee/IG)