देशात आज कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे

गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 4 हजार 575 नवीन रुग्ण आढळले असून 145 जणांचा मृत्यू झाला आहे

काल 3 हजार 993 रुग्ण आणि 108 मृत्यूची नोंद झाली

आकडेवारीनुसार कालच्या तुलनेत आज रुग्ण संख्या वाढली आहे

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 59 हजार 442 झाली आहे

कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 15 हजार 335 झाली आहे

आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 13 हजार 566 लोक संसर्गमुक्त झाले आहेत

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे आतापर्यंत 179 कोटी डोस देण्यात आले आहेत

मंगळवारी दिवसभरात 18 लाख 69 हजार 103 डोस देण्यात आले आहेत