'भाबीजी घर पर हैं' ही मालिका गेल्या सात वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे

नेहा पेंडसे 'भाबीजी घर पर हैं' मालिकेतून बाहेर पडल्यानंतर आता 'गोरी मेम'च्या भूमिकेत विदिशा श्रीवास्तव दिसणार आहे

निर्मात्यांनी 'गोरी मेम'च्या भूमिकेत विदिशा श्रीवास्तवचे नाव फायनल केले आहे

नुकताच एक प्रोमो जारी करून शोमध्ये विदिशाची एंट्री दाखवण्यात आली आहे

हा प्रोमो चांगलाच व्हायरल झाला असून विदिशाच्या रुपात नवीन 'गोरी मेम' पाहून चाहते खूप खूश झाले आहेत

विदिशा श्रीवास्तवने 2007 मध्ये, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधून तिच्या अभिनयाची सुरुवात केली

'अनिता भाभी'ची भूमिका साकारणारी विदिशा खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे

याचा अंदाज तुम्हाला तिचे इंस्टाग्रामवरील फोटो पाहून येईल

विदिशा स्टायलिश आणि फॅशनेबल अभिनेत्रींपैकी एक असून तिला फिरायची आवड आहे