देशातील कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसागणिक कमी होत आहे देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 528 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 149 जणांचा मृत्यू झाला आहे गुरुवारी दिवसभरात 3 हजार 997 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे देशातील एकुण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 29 हजार 181 वर पोहोचली आहे देशातील कोरोना रुग्ण सकारात्मक दर 0.40 इतका झाला आहे देशात आतापर्यंत एकूण 5,16,281 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे देशात गेल्या 24 तासांत 3997 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत आतापर्यंत एकूण 4 कोटी 24 लाख 58 हजार 543 रुग्ण बरे झाले आहेत कोरोना संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे 180 हून अधिक डोस देण्यात आले आहेत