देशातील कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांमध्ये 10.6 टक्क्यांची घट झाली आहे



गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 1270 नवीन रुग्ण आढळले असून 31 जणांचा मृत्यू झाला आहे



काल कोरोनाचे 1421 रुग्णांची नोंद आणि 149 जणांचा मृत्यू झाला होता



केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, रविवार दिवसभरात देशात 1 हजार 567 रुग्ण कोरोनातून बरे झाले



सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 15 हजार 859 वर पोहोचली आहे



कोरोना विषाणुमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 21 हजार 35 झाली आहे



देशात आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 83 हजार 829 रुग्ण कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत



देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे 183 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत



रविवार दिवसभरात 4 लाख 20 हजार 842 डोस देण्यात आले



आतापर्यंत लसीचे 183 कोटी 26 लाख 35 हजार 673 डोस देण्यात आले आहेत



Thanks for Reading. UP NEXT

पापमोचनी एकादशीनिमित्त आळंदी आणि देहू नगरी सजली

View next story