देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये किंचित वाढ झाली आहे

देशात गेल्या 24 तासांत 1260 नव्या रुग्णांची नोद झाली असून 83 जणांचा मृत्यू झाला आहे

काल 1335 रुग्णांची नोंद आणि 52 रुग्णांचा मृत्यू झाला

देशात शुक्रवारी दिवसभरात 1 हजार 404 कोरोनामुक्त झाले आहेत

देशात सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होऊन कोरोनाबाधितांची संख्या 13 हजार 445 वर पोहोचली आहे

देशात आतापर्यंत 5 लाख 21 हजार 264 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे

देशात आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 92 हजार 326 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत

कोरोना महामारी सुरु झाल्यापासून आतापर्यंत देशात आतापर्यंत 4 कोटी 30 लाख 27 हजार 35 जणांना कोरोनाची लागण झाली आहे

कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे आतापर्यंत 184 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत

शुक्रवारी दिवसभरात 18 लाख 38 हजार 552 डोस देण्यात आले