अभिनेत्री उर्फी जावेद सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. बोल्ड कपडे आणि हटके स्टाइलने उर्फी चाहत्यांना घायाळ करत असते. पण आता उर्फी जावेदच्या अडचणीत वाढ झाली आहे. फॅशन आणि बोल्ड कपड्यांच्या माध्यमातून सोशल मीडियावर अश्लीलता पसरवल्याबद्दल तिच्यावर आरोप करण्यात आले आहेत. उर्फी जावेद विरोधात मुंबईतील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 डिसेंबरला उर्फीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी हिंदुस्तान भाऊनेही उर्फीला सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी दिली होती. मुंबई पोलिसांआधी दिल्ली पोलीस ठाण्यातदेखील एका व्यक्तीने उर्फी विरोधात तक्रार दाखल केली होती. 'हाय हाय ये मजबूरी' या गाण्याच्या व्हिडीओमध्ये बोल्ड कपडे घातल्याने उर्फीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. उर्फीला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.