उर्फी जावेदचा प्रत्येक लूक पाहून लोक हैराण होतात..
उर्फी जावेद कशापासूनही कपडे बनवू शकते,
तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे ती आज इंटरनेट सेन्सेशन बनली आहे.
टीव्ही शोमधून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या उर्फीच्या अभिनयाला विशेष दाद मिळाली नसेल,
पण तिच्या बोल्डनेसमुळे तिने जगभरातील लोकांना आपले वेड लावले आहे
पण आता उर्फीच्या अडचणीत वाढ झाली आहे.
फॅशन आणि बोल्ड कपड्यांच्या माध्यमातून सोशल मीडियावर अश्लीलता पसरवबद्दल तिच्यावर आरोप करण्यात आले आहेत.
उर्फी जावेद विरोधात मुंबईतील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 डिसेंबरला तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
वकील काशिफ खान (Kashif Khan) यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात लिखित स्वरुपाचा अर्ज देत उर्फी विरोधात तक्रार दाखल केली आहे