दुलकर सलमान आणि सनी देओलचा 'चुप: रिवेंद ऑफ द आर्टिस्ट' हा सिनेमा नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आलिया-रणबीरच्या 'ब्रह्मास्त्र'नंतर 'चुप' सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे. 'चुप: रिवेंद ऑफ द आर्टिस्ट' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा आर बाल्कीने सांभाळली आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 2.60 ते 3.20 कोटींची कमाई केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 'चुप: रिवेंद ऑफ द आर्टिस्ट' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे. 'चुप' या सिनेमात प्रेक्षकांना थरार, नाट्य अनुभवायला मिळणार आहे. सनी देओल, दुलकर सलमान व्यतिरिक्त या सिनेमात पूजा भट्ट, आणि श्रेया धनवंतरीदेखील मुख्य भूमिकेत आहेत. 'चुप: रिवेंद ऑफ द आर्टिस्ट' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा राकेश झुनझुनवाला, जयंतीलाल गडा, अनिल नायडू आणि गौरी शिंदेने सांभाळली आहे. चुप या सिनेमात अमिताभ बच्चन अभिनेते म्हणून नव्हे तर ‘संगीत संयोजक’ म्हणून झळकत आहेत.