धावपळीच्या काळात अनेकांचा आहार बिघडला आहे, त्यामुळे कोलेस्ट्रॉल सारखी समस्या वाढत चालली आहे.

शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यास हृदयाशी संबंधित गंभीर आजार होण्याचा धोका असतो.

लवंग जवळजवळ प्रत्येकांच्या स्वयंपाकघरात मसाला म्हणून वापरली जाते.

त्याचा वापर केल्याने जेवणाची चव तर वाढतेच पण त्याच्या सेवनाने अनेक आरोग्य समस्या देखील दूर होतात.

लवंगात प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि कॅल्शियमसारखे पोषक घटक आढळतात.

दररोज सकाळी लवंग पाणी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.

तुम्ही पाण्यात लवंग उकळून रोज सकाळी पिऊ शकता.

याशिवाय रात्री एका ग्लास पाण्यात लवंग टाकून सकाळी गाळून सेवन करा.

तुमच्या जीवनशैलीत काही बदल करून कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवू शकता.



यासाठी नियमित व्यायाम करा आणि जास्त फायबरयुक्त पदार्थ, भाज्या आणि फळे यांचे सेवन करा.

टीप : या सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने.