राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं हजेरी जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी या पावसामुळं नुकसान झालं आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. सोलापूर शहरासह अक्कलकोट, मोहोळ, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा या तालुक्यात पावसानं हजेरी लावली कुठे शेती पिकांना फटका बसलाय तर कुठे घरांचं नुकसान झालंय. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळं झाडे उन्मळून पडली आहेत. विजेच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं सोलापूर शहरात अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. महावितरणच्या विद्युत यंत्रणाचे मोठे नुकसान झाले आहे. ग्रामीण भागात झालेल्या पावसानं शेती पिकांचं नुकसान झालं आहे.