पायाखालची जमीन सरकणं म्हणजे नेमकं काय याचा शब्दशः प्रत्यय काल चंद्रपुरातील घुग्गुस (Chandrapur Ghuggus) शहरात पाहायला मिळाला घुग्गुसमधील एक घर चक्क 70 फूट जमिनीत उभं गाडलं गेलं. कोळसा खाणींच्या जवळ असलेल्या आमराई भागात ही घटना घडली आहे. काल या घराला अचानक हादरे बसायला लागले. त्यामुळे घरातील सदस्य धावत बाहेर आले आणि त्यानंतर अवघ्या काही क्षणात हे घर कोसळलं आणि जमिनीत गायब झालं. इथे 70 फुटांचा खड्डाही पडला. कोळसा खाणीमुळे हा प्रकार झाल्याची या भागात चर्चा आहे. चंद्रपूर तालुक्यातील घुग्गुस शहरात गजानन मडावी यांचं हे घर होतं. कोळसा खाणींच्या जवळ असलेल्या आमराई वार्डात ही घटना घडली. या शहराशेजारी सर्वत्र असलेल्या भूमिगत कोळसा खाणीमुळे हा प्रकार झाल्याची चर्चा आहे.