2022 वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण (Chandra Grahan 2022) कार्तिक पौर्णिमेला म्हणजेच मंगळवारी 8 नोव्हेंबर 2022 रोजी होणार आहे. चंद्रग्रहणाच्या वेळी गरोदर महिलांनी (Pregnant Women) काही खास गोष्टींची विशेष काळजी घ्यावी असे मानले जाते की, चंद्रग्रहण गर्भवती महिलांसाठी अशुभ परिणाम देणारा असतो, म्हणून त्यांना ग्रहण काळात घरीच राहण्याचा सल्ला दिला जातो. चंद्रग्रहण काळात गर्भवती महिलांनी भाजी कापण्यासाठी, कपडे शिवण्यासाठी धारदार साधनांचा वापर टाळावा. चंद्रग्रहण काळात गर्भवती महिलांनी झोपू नये, स्वयंपाक करू नये गर्भवती महिलेने जिभेवर तुळशीची पाने ठेवून हनुमान चालीसा आणि दुर्गा स्तुतीचा पाठ करावा. यादरम्यान देव मंत्रांचा जप केल्याने ग्रहणाच्या दुष्परिणामांपासूनही बचाव होतो. ग्रहण संपल्यानंतर, गर्भवती महिलेने पवित्र पाण्याने स्नान करावे, अन्यथा तिच्या बाळाला त्वचा रोग होण्याची शक्यता असते. चंद्रग्रहण काळात मंत्रजपाचे खूप महत्त्व आहे. यावेळी गर्भवती महिला मंत्रोच्चार करून स्वतःचे रक्षण करू शकतात. यामुळे मुलाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर चांगला आणि सकारात्मक परिणाम होतो. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.