मेष - जीवनात समृद्धी आाणायची असेल तर आजच्या एकादशीच्या दिवशी मेष राशीच्या लोकांनी तुळशीला लाल कापड अर्पण करावं. तसेच भगवान विष्णूला एक नारळ अर्पण करा.



वृषभ - जर तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळवायचे असेल, जीवनाच्या उंच स्थानी जायचे असेल तर आजच्या दिवशी भगवान विष्णूच्या मूर्तीची आणि तुळशीची पुजा करा.



मिथुन - तुमचे जीवन सदैव आनंदी पाहायचे असेल तर आज भगवान विष्णूची विधिवत पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवावा.



कर्क - नोकरीत चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर कर्क राशीच्या लोकांनी आज श्री विष्णूला हळदीचा गंध लाऊन पुजा करावी.



सिंह - सिंह राशींच्या लग्न झालेल्या लोकांच्या जीवनात जर वैवाहिक काही समस्या येत असतील तर दोघांनी दक्षिणावर्ती शंखात पाणी भरुन भगवान विष्णूला अर्पण करावे. तसेच मंदिराच्या प्रांगणात किंवा कोणत्याही बागेत तुळशीचे रोप लावावे.



कन्या - जर तुम्हाला तुमच्या जीवनात ऊर्जा टिकवून ठेवायची असेल तर आज तुळशीच्या रोपाजवळ पिवळे कापड ठेवावे.



तूळ - तुमच्या मुलीच्या विवाहात काही अडचणी येत असतील तर त्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी पाच तुळशीची पाने घ्यावीत आणि ती श्रीहरीला अर्पण करावी.



वृश्चिक - तुमचा आवडता जीवनसाथी मिळवायचा असेल तर ओम नमो भगवते नारायण मंत्राचा जप करताना तुळशीच्या रोपाला केशर मिश्रित दूध अर्पण करा.



धनु - तुमची आर्थिक सुख-समृद्धी वाढवायची असेल, तर आजच्या एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावावा. तसेच भगवान विष्णूची धूप-दीप, फुले इत्यादींनी पूजा करावी.