2022 या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण (Chandra Grahan) 8 नोव्हेंबर रोजी लागणार आहे.



8 नोव्हेंबर रोजी कार्तिक महिन्यातील पौर्णिमा आहे. त्या दिवशीच हे ग्रहण लागणार आहे



8 नोव्हेंबर रोजी, हे चंद्रग्रहण भारतात संध्याकाळी 5.32 वाजता दिसेल आणि संध्याकाळी 6.18 वाजता संपेल.



त्याचा सुतक काळ भारतात वैध असेल. या चंद्रग्रहणाच्या काळात ग्रहांच्या स्थितीमुळे अनेक योग तयार होतील,



चंद्रग्रहणात घ्या खबरदारी - ग्रहणकाळात खाण्यापिण्याचे पदार्थ खाऊ नका, अन्न शिजवू नका.



ग्रहणाच्या काही वेळ आधी अन्नपदार्थांमध्ये तुळशीची पाने टाकावीत



ग्रहण काळात गर्भवती महिलांनी घरातून किंवा खोलीतून बाहेर पडू नये.



ग्रहण काळात आपल्या इष्ट देवतेशी संबंधित मंत्रांचा जप करा



देवाच्या मूर्तीला घरात किंवा मंदिरातील पूजास्थळी स्नान केल्याशिवाय स्पर्श करू नका.



ग्रहणानंतर स्नान करून घरात गंगाजल शिंपडावे.



(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)