काजूमध्ये व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी 6, मॅग्नेशियम आणि मॅंगनीज सारखे पोषक घटक आढळतात.
ही सर्व जीवनसत्त्वे आणि खनिजे हाडे मजबूत करण्यास मदत करतात. याशिवाय सांधेदुखीपासूनही आराम मिळतो.
सांधे आणि हाडांच्या दुखण्यापासून आराम मिळण्यासाठी दुधात भिजवलेले काजू नक्की खावे.
यासाठी 3 ते 5 काजू एक ग्लास दुधात भिजवून रात्रभर ठेवा. त्यानंतर सकाळी उठून काजू दुधात उकळा. यानंतर काजू चावून दूध प्यावे.
एक गोष्ट लक्षात ठेवा की हे काजू कधीही जास्त प्रमाणात खाऊ नका, कारण काजूचा प्रभाव खूप गरम असतो. यामुळेच काजूचे जास्त सेवन करू नका.