जर तुम्ही सोने तारण ठेवून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर प्रथम तुम्हाला पावती दाखवावी लागेल किंवा तुम्हाला स्व-घोषणापत्र द्यावे लागेल.
Image Source: META AI
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) शुक्रवारी सुवर्ण कर्जाच्या नियमांमध्ये मोठे बदल केले, जे लवकरच लागू होणार आहेत.
Image Source: META AI
या नवीन नियमांमध्ये एलटीव्ही रेशोमध्ये वाढ, 2.5 लाख रुपयांपर्यंतच्या सोन्याच्या कर्जासाठी क्रेडिट मूल्यांकनातून सूट इत्यादींचा समावेश आहे.
Image Source: META AI
'आरबीआयने' आपल्या प्रस्तावात म्हटले आहे की जर सोन्याच्या कर्जाच्या मालकीबाबत शंका असेल तर बँका किंवा 'एनबीएफसी' कर्ज देणार नाही.
Image Source: META AI
जर तुम्ही सोने गहाण ठेवून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर प्रथम तुम्हाला पावती दाखवावी लागेल.
Image Source: META AI
जर तुमच्याकडे मूळ पावती नसेल, तर तुम्हाला स्व-घोषणापत्र द्यावे लागेल. आणि तुम्हाला हे सिद्ध करावे लागेल की तुम्हाला दागिने वारशाने मिळाले आहेत आणि त्यावर तुमचा मालकी हक्क आहे.
Image Source: META AI
कधीकधी असे घडत की लग्नात पालक आपल्याला दागिने देतात आणि आपल्याला पावती मिळत नाही अशी शक्यता असली , तर अशा परिस्थितीत आपण आपले सोने ठेवून कर्ज घेऊ शकतो का?
Image Source: META AI
उत्तर असे आहे की जर तुम्हाला सोन्याचे दागिने वारशाने मिळाले असतील आणि तुमच्याकडे त्याची पावती नसेल, तरीही तुम्हाला कर्ज मिळू शकते, जर सोने खरे आणि वैध असेल.
Image Source: META AI
कर्जासाठी अर्ज करण्यासाठी, पॅन कार्ड, आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट यासारखी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावी लागेल.
आरबीआयचे उद्दिष्ट लहान कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना पारदर्शक पद्धतीने कर्ज देणे जेणेकरून त्यांना अधिक आत्मविश्वास आणि सुरक्षितता मिळेल.'
Image Source: META AI
ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा त्रास होऊ नये म्हणून आरबीआय बँका आणि एनबीएफसींसाठी एकसमान नियम ठरवू इच्छिते.
Image Source: META AI
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)