अनेकजणांकडे एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड्स असतात. एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड्स असतील तर तुम्हाला वापरायला मिळणआऱ्या पैशांची मर्यादा वाढते. मात्र क्रेडिट कार्डचा चुकीचा वापर केल्यास तुमचा सिबिल स्कोअर हा घटू शकतो. तुम्ही क्रेडिट कार्डवरून काही खरेदी केले असेल तर ड्यू डेटकडे खास लक्ष देणे गरजेचे आहे. तुम्ही ड्यू डेटच्या अगोदर पैसे जमा न केल्यास तुम्हाला विलंब शुल्क लागू शकते. क्रेडिट कार्डचा वापर करताना क्रेडिट युटिलाइझेशन रेशोकडे लक्ष ठेवले पाहिजे. क्रेडिट कार्डचा वापर करताना क्रेडिट युटिलाइझेशन रेशोकडे लक्ष ठेवले पाहिजे. तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचा वापर लिमिटच्या 30 टक्केपेक्षा अधिक करू नये. तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल त्यासाठी तुम्हाला वार्षिक फी द्यावी लागते. क्रेडिट कार्डचा वापर करताना मिनिमम ड्यूच्या मोहात पडू नये.