भविष्यातील आर्थिक समस्यांपासून जर तुम्हाला सुटका हवी असेल कर गुंतवणूक करणं गरजेचं आहे. देशभरात अशा अनेक पेन्शन योजना आहेत ज्या रिटायरमेंटनंतर चांगल्या आहेत. अशी NPS स्कीम आहे जी 1 कोटी रुपये आणि 1 लाखची पेन्शन मिळण्याची शक्यता आहे. वयाच्या 30 व्या वर्षी NPS मध्ये गुंतवणूक करु शकता. यासाठी प्रत्येक महिन्याला 10 हजार रुपयांची गुंतवणूक करु शकता. त्यानंतर 60 व्या वर्षांपर्यंत 36 लाख रुपयांची एकूण गुंतवणूक होईल. 10 टक्के रिटर्नच्या आधारावर 60 व्या वर्षी 2.28 कोटी रुपयांची कॉर्पस होईल. याचाच अर्थ एन्युटी प्लॅनमध्ये तुम्ही 40 टक्के तुम्ही कॉर्पस गुंतवणूक करा. 55 टक्के एन्युटीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला 1.04 लाख रुपयांपर्यंत मासिक पेन्शन असेल. तर, NPS मधून 1.02 कोटी रुपयांची रक्कम सुद्धा मिळेल.