रोजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना वेळेची कमतरता जाणवत आहे, प्रवासी गर्दीत किंवा रांगेत उभे राहून जनरल तिकीट बुक करणे टाळतात, पण आता त्यांना त्रास करून घेण्याची गरज नाही.
रेल्वेने नुकतेच एक मोबाइल ऍप्लिकेशन RailOne सुरू केले आहे, ज्यामुळे कोणत्याही रांगेची वाट न पाहता जनरल तिकीट बुक करता येते. चला तर मग पाहूया तिकीट बुकिंग कसे करू शकता.
सर्वात आधी प्ले स्टोअर किंवा ॲपल स्टोअरमधून ॲप डाउनलोड करून लॉग इन करा, त्यानंतर सर्च ट्रेन किंवा अनरिझर्व्हड तिकीट हा पर्याय निवडा.
प्रवासाचा तपशील प्रविष्ट करा, म्हणजे कुठून कोठे पर्यंतचे तिकीट बुक करायचे आहे ते नमूद करा. तसेच, ट्रेन निवडा. त्यानंतर, प्रवाशांची माहिती, जसे नाव, वय, लिंग प्रविष्ट करा आणि UPI, कार्ड, नेट बँकिंग सारखे पेमेंट पर्याय निवडा.
टिकीट बुक झाल्यावर My Bookings विभागात जा. तिथे तुम्हाला QR कोड दिसेल, जो तुम्ही TT ला दाखवू शकता.
यासोबतच तिकीट रद्द करण्याचा पर्यायही या ॲपमध्ये समाविष्ट आहे, ज्यामुळे प्रवाशांना सहज तिकीट रद्द करता येईल.
रेल्वेचा दावा आहे की या ॲपमुळे तिकीट बुक केल्यास प्रवाशांना भाड्यावर 3 टक्क्यांपर्यंत सवलत मिळेल.
याव्यतिरिक्त, RailOne ॲपवरून प्रवासी आरक्षित आणि प्लॅटफॉर्म तिकीटं सहज बुक करू शकतात.
रेल्वेने जारी केलेल्या या ॲपमुळे प्रवाशांना प्रवास करणे सोपे होईल तसेच जनरल तिकीट किंवा प्लॅटफॉर्म तिकीट बुक करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही.