सोने-चांदी पुन्हा तेजात! वाढीमागचं रहस्य काय?

Published by: जगदीश ढोले
Image Source: PINTEREST

मागील दोन दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण झाली होती. मात्र 13 ऑगस्ट रोजी सोन्याच्या किमतींमध्ये हलकी वाढ झाली.

Image Source: PINTEREST

बुलियन मार्केट आणि एमसीएक्स दोन्ही ठिकाणी सोन्याचा दर वाढला आहे. कालप्रमाणेच चांदीची चमकही कायम आहे.

Image Source: PINTEREST

24 कॅरेट सोन्याचा दर आज 10 ग्रॅमला ₹1,00,440 झाला.
22 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमला ₹92,070 आहे.

Image Source: PINTEREST

24 तासांपूर्वी 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,00,170 होता, आता तो वाढून ₹1,00,440 वर पोहोचला आहे.

Image Source: PINTEREST

चांदीचा दरही वाढून किलोमागे ₹1,15,260 झाला आहे, 24 तासांपूर्वी हा भाव ₹1,13,600 होता.

Image Source: PINTEREST

सोमवारी चांदीचा भाव 1000 रुपयांनी घसरून ₹1,14,000 झाला होता, शुक्रवारी तो ₹1,15,000 प्रति किलोवर स्थिरावला.

Image Source: PINTEREST

गेल्या पाच दिवसांत चांदीच्या दरात 5500 रुपयांनी वाढ झाली, आता पुन्हा किंमतींमध्ये वाढ दिसून येते.

Image Source: PINTEREST

सलग पाच दिवसांच्या वाढीनंतर सोन्याचा दर 900 रुपयांनी घसरला होता, आता पुन्हा वाढ होत आहे.

Image Source: PINTEREST

भूराजकीय तणाव आणि गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे दरात घसरण झाली होती. आता परिस्थितीत बदल होत आहे.

Image Source: PINTEREST

अमेरिका-रशिया भेटीमुळे भूराजकीय तणाव कमी झाला आहे. सोन्याच्या बारवरील 39% शुल्काबाबत व्हाईट हाऊसच्या स्पष्टीकरणाचा परिणाम किमतींवर झाला.

Image Source: PINTEREST

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: pinterest