‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट रिलीज होऊन 15 दिवस झाले आहेत, तरी देखील हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.
ABP Majha

‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट रिलीज होऊन 15 दिवस झाले आहेत, तरी देखील हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.

चित्रपटातील आलिया आणि रणबीर कपूर यांच्या केमिस्ट्रीला तसेच चित्रपटातील VFX ला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
ABP Majha

चित्रपटातील आलिया आणि रणबीर कपूर यांच्या केमिस्ट्रीला तसेच चित्रपटातील VFX ला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (23 सप्टेंबर) या चित्रपटानं  9.75 ते 11 कोटींची कमाई केली.
ABP Majha

एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (23 सप्टेंबर) या चित्रपटानं 9.75 ते 11 कोटींची कमाई केली.

आता चित्रपटाची एकूण कमाई जवळपास 230 कोटी एवढी झाली आहे.
ABP Majha

आता चित्रपटाची एकूण कमाई जवळपास 230 कोटी एवढी झाली आहे.

ABP Majha

लवकरच हा चित्रपट 250 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होईल. जगभरातील बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं 360 कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे.

ABP Majha

आता वीकेंडला हा चित्रपट किती कमाई करेल? या प्रश्नाचं उत्तर लवकरच आलिया आणि रणबीरच्या चाहत्यांना मिळेल.

ABP Majha

ब्रह्मास्त्र या चित्रपटामध्ये आलिया आणि रणबीरसोबतच अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.

ABP Majha

शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणनं या चित्रपटामध्ये छोटी पण महत्त्वाची भूमिका साकारली आहे. सध्या सोशल मीडियावर ब्रह्मास्त्र चित्रपटातील शाहरुख आणि दीपिकाच्या लुक्सचे फोटो व्हायरल होत आहेत.

ABP Majha

दोन वर्षांनी म्हणजेच 2025 मध्ये ब्रह्मास्त्रचा दुसरा पार्ट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, अशी माहिती अयाननं दिली होती.

ABP Majha

काही दिवसांपासून बॉयकॉट ब्रह्मास्त्र हा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.