'हवाहवाई' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सध्या हा सिनेमा चर्चेत आहे.



'द ग्रेट इंडियन किचन' या बहुचर्चित मल्याळम सिनेमातील अभिनेत्री निमिषा संजयनं 'हवाहवाई' या सिनेमाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे



पण निमिषाच्या जागी मराठमोळी, अभ्यासू अभिनेत्री मुक्ता बर्वे दिसणार होती.



'हवाहवाई' या सिनेमासाठी अभिनेत्री मुक्ता बर्वेला विचारणा झाली होती



पण तेव्हा मुक्ताला कोरोनाची लागण झाल्याने तसेच तिला



'अजूनही बरसात आहे' ही मालिका मिळाल्याने तिने 'हवाहवाई' या सिनेमाला रामराम ठोकला.



'अजूनही बरसात आहे' या मालिकेत मुक्ता उमेश कामतसोबत दिसून आली होती.



मालिकेत मुक्ताने मीरा हे पात्र साकारलं होतं.



'हवाहवाई' या सिनेमात कलाकारांची फौज आहे



निमिषासह वर्षा उसगावकर, सिद्धार्थ जाधव, समीर चौघुले अशा दमदार कलाकारांची फौज 'हवाहवाई' या सिनेमात आहे