अभिनेता आमीर खान पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमासाठी अकोल्यात, पांढरी टोपी आणि कुर्ता पायजमा अशा मराठमोळ्या लूकमध्ये कार्यक्रला हजेरी लावली.
Published by: जयदीप मेढे
Image Source: Akola Reporter
बॉलीवूड अभिनेते आमिरखान आज अकोल्यात आलेयेत.
Image Source: Akola Reporter
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ते शेतकऱ्यांशी संवाद साधतायेत.
Image Source: Akola Reporter
'पाणी फाउंडेशन' चळवळीत योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांसोबत आमिर खान संवाद साधणारायेत.
Image Source: Akola Reporter
आज सकाळी नऊ वाजता अकोल्याच्या विमानतळावर त्यांचा आगमन झालंय.
Image Source: Akola Reporter
त्यानंतर त्यांनी कृषी विद्यापीठातील विविध प्रक्षेत्रांना भेटी यामध्ये पशुसंवर्धन आणि दुग्ध विभाग, हॉर्टिकल्चर, सेंद्रिय शेती संशोधन विभाग, फळ आणि रोपवाटिका विभाग यांना भेटी दिल्यात.
Image Source: Akola Reporter
यावेळी आमिर खान खास मराठमोळ्या लुकमध्ये दिसून आलेय.
Image Source: Akola Reporter
गुलाबी कलरचा कुर्ता आणि डोक्यावर टोपी अशा पेहरावात त्यांनी शेतकऱ्यांशी आणि शास्त्रज्ञांची संवाद साधलाय.