बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आज (8 जून) तिचा 47वा वाढदिवस साजरा करत आहे.



शिल्पा आता दोन मुलांची आई आहे, पण तिला पाहून याचा अंदाज लावणं थोडं कठीण होऊन जातं.



इंडस्ट्रीपासून ते चाहत्यांपर्यंत शिल्पाला केवळ अभिनेत्री म्हणूनच नाही तर, ‘फिटनेस क्वीन’ म्हणूनही ओळखले जाते.



शिल्पा जितकी उत्तम डान्सर आहे, तितकाच सुंदर ती अभिनयही करते.



बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी शिल्पाने तिच्या करिअरची सुरुवात जाहिरातीतून केली होती.



आता ती बॉलिवूड विश्व गाजवतेय. सध्या शिल्पा शेट्टी सोनी टीव्हीवर प्रसारित होणार्‍या ‘सुपर डान्सर चॅप्टर’ या डान्स रिअॅलिटी शोला जज करत आहे.



शिल्पा शेट्टीचा जन्म 8 जून 1975 रोजी कर्नाटकातील मंगलोर येथे झाला.



1991मध्ये वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी शिल्पाने तिच्या करिअरची सुरुवात केली.



एका जाहिरातीतून तिने मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते. त्यानंतर 1993मध्ये शिल्पाला ‘बाजीगर’ या चित्रपटात भूमिका मिळाली.



या चित्रपटाद्वारे तिने फिल्मी दुनियेत पहिले पाऊल ठेवले. आपल्या अभिनयाने मनोरंजन विश्व गाजवणारी शिल्पा शेट्टी हिने तिच्या बालपणात भरतनाट्यम शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले होते.